Ad will apear here
Next
‘कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे’
औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार भास्कर जाधवांची मागणी
मुंबई : ‘स्वतंत्र विद्यापीठासाठी कोकणातील सर्व महाविद्यालये सकारात्मक असून, शिक्षणप्रेमींकडूनही स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे. त्यामुळे सोलापूर, नांदेड, गडचिरोली, जळगावच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आज (२८ जून) विधानसभेत केली.

७६४ महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षमतेविषयी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पेपरफुटीचे अनेक प्रकार, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेला विलंब आणि परीक्षांच्या ऑनलाइन निकालांमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने विद्यापीठावर नामुष्कीची वेळ आली आहे,’ असेही जाधव यांनी स्पष्ट केले. 

या सर्व प्रकारांमुळे सध्या मुंबई विद्यापीठात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका कोकणातील विद्यार्थ्यांना बसला असून, हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मुंबई विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कोकणातील शिक्षणप्रेमी नागरिक, संस्था आणि विद्यार्थ्यांमधून केली जात असल्याचे आमदार जाधव यांनी नमूद केले.

‘कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ४५, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ आणि दक्षिण रायगडमधील २० अशा १०३ महाविद्यालयांसाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करणे शक्य आहे. स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिकांच्या गरजेप्रमाणे सुसंगत असे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करणे शक्य होईल,’ असेही जाधव यांनी सभागृहात सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZGSCB
Similar Posts
‘कोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांनाच सामावून घ्या’ मुंबई : ‘सन २०१०ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया होऊन ७० टक्के स्थानिकांना सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय करून कोकणातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा,’ अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे २६ जून रोजी विधानसभेत केली.
चक्रीवादळ मुंबईजवळ धडकण्याची शक्यता; अतिदक्षतेचा इशारा मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे
‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेत दुरुस्ती’ मुंबई : ‘रत्नागिरी, सिंधुदुर्ग घरबांधणी, घरदुरुस्ती अधिसूचनेमध्ये २०१५पूर्वी बांधकाम परवानगी देण्यासाठी जे नियम व अटी प्रचलित होते तेच पुन्हा लागू करण्यासाठी अधिसूचनेमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करा,’ अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.
‘रत्नागिरी जिल्ह्यातील जेटींच्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा’ मुंबई : ‘दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील विविध जेटींची आणि रस्त्यांची कामे, तसेच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करा,’ अशा सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language